कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: पांगरी ता. बार्शी येथील राजीव गांधी केंद्रीय आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवेशिका शैलेजा राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी शिक्षक शिवाजी बगाडे, अधीक्षक वाहिद शेख, शिवशंकर धारुरकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.