आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रंथपाल अविनाश कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल अविनाश कावळे, गणेश सारंग, आसिफ मुलाणी, कालिदास विधाते, अभिषेक जाधव, शशिकला गादेकर, राणी वायकर आदी उपस्थित होते.