आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी प्रतिनिधी,२१ नोव्हेंबर : उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील युवक रामविजय अशोक जाधव याने इंडियन आर्मी मध्ये यश संपादन केल्यामुळे कारी ग्रामस्थांकडून रामविजय जाधव व त्यांचे वडील अशोक जाधव या पिता-पुत्रांचा सत्कार करण्यात आला.
रामविजय जाधव यांचे सैन्य भरतीत यश,कारी ग्रामस्थांकडून पिता-पुत्रांचा सन्मान
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यातूनही अथक परिश्रम घेत त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. रामविजय जाधव यांचं शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंत व माध्यमिक शिक्षण श्री.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय कारी आणि शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी झाले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील गरुड झेप अकॅडमीत प्रवेश घेऊन अथक परिश्रम केले. यासाठी त्यांना गरुड झेप चे संचालक एस. एस. सोनवणे, प्रमोद सर, पठाण सर, अमोल सर यांचे मार्गदर्शन मिळाले.
या कार्यक्रमासाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजित डोके, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव, कृषी सहाय्यक शेख, खासेराव विधाते, राजाराम गेंड,विजयसिंह विधाते, राजाभाऊ देसाई, शाहू जाधव विनायक ढेंबरे, सतीश सारंग, रमेश गायकवाड, गावातील युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.