fbpx

बार्शीतील ७ शिक्षकांना ‘राष्ट्र शिल्पकार पुरस्कार’, रोटरीकडून गुरुजनांचा सन्मान

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : शहरातील रोटरी क्लब बार्शीतर्फे राष्ट्र शिल्पकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून रोटरी क्लब बार्शीमार्फत शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो, यावर्षी सात शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ.रो. सदानंद भिलेगावकर उपस्थित होते. तर, रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम सावळे, सेक्रेटरी कौशिक बंडेवार व डॉ. विजयश्री पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

बार्शी तालुक्याच्या शैक्षणिक कार्यातील योगदानाची दखल घेत रोटरीच्यावतीने गुरुजनांचा सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा दरवर्षी नित्यनियमाने पार पडतो. यंदाही ७ शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये, ग्रामीण भागातील ५ आणि शहरातील 2 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
१. शिक्षिका शोभा प्रल्हाद रणशूर(मेहेर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,बळेवाडी)
२. शिक्षिका शमशाद अ. गंनी सय्यद (शाहीर अमर शेख न. पा. शाळा क्रमांक 11 ,बार्शी)
३. शिक्षिक उमेश विष्णू पाटील (महात्मा गांधी प्रशाला ,काटेगाव)
४. शिक्षिका लता रामकृष्ण मोरे(महात्मा गांधी प्रशाला, काटेगाव)
५. शिक्षिक अजय सदाशिव टोपे (लोकसेवा विद्यालय ,आगळगाव)
६. शिक्षिका संगीता संदीप गायकवाड (किसान कामगार विद्यालय, उपळाई ठों.)
७. प्रा. डॉ. उषा विठ्ठलराव गव्हाणे (श्री शिवाजी महाविद्यालय ,बार्शी)

या कार्यक्रमात सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याबद्दलची माहिती डॉ. विजयश्री पाटील यांनी सांगितली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिलेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आज शिक्षकांबद्दलचा आदर विद्यार्थ्यांमध्ये कमी होत चालला आहे. हा आदर वाढण्यासाठी शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही व समाजाची तेवढीच जबाबदारी आहे. एखाद्या राष्ट्राचे भविष्य घडविण्यात शिक्षक खूप महत्त्वाची जबाबदारी निभावतात. या कार्यक्रमात रोटरी इंटरनॅशनल या संस्थेबद्दल मधुकर डोईफोडे यांनी माहिती दिली. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम सावळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश पाटील व डॉक्टर उषा गव्हाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व रोटरी क्लब बार्शीचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी कौशिक बंडेवार यांनी केले.

दरम्यान, यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बार्शी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विजय शहा, डॉ. नारायण देशपांडे, प्रमोद काळे, सुहास श्यामराज व रोटरी सदस्य स्मिता श्यामराज, अमित खटोड, रोहित कटारिया, शैलेश वखारिया, पियुष कोटेचा, आनंद महाजन, विशाल रगडे, कृष्णा सोमानी, सौरभ गुंदेचा, बळी डोईफोडे, आनंद बेदमुथा व अतुल कल्याणी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा व निकिता शिंदे यांनी केले.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा !  या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *