fbpx

राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

कुतूहल न्यूज नेटवर्क
मळेगाव : समजतील अज्ञान, अंंधश्रद्धा, भोळ्या समजुती, रूढी परंपरा, दूर करण्यासाठी ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य वेचले, देव दगडात नसून तो माणसात आहे हे सर्वसामान्य माणसाच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला असे समाजसुधारक व स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यलयात उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन पूजा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी यशदाचे शिवाजीराव पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, महाराष्ट्र राज्य धनगर समाज सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सागर शेळके, यशवंत गाडे, संतोष गुजर, जयवंत गाडे, शंकर जाधव, मुन्ना शेख, ग्रामपंचायत संगणक परिचालक प्रशांत पटणे, आरोग्य कर्मचारी रुकुम अडगळे, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *