fbpx

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पाथरी येथे रास्ता रोको

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी:  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी – कळंब रस्त्यावर पाथरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पाथरीच्या धरणामध्ये उजनीच्या कॅनॉलचे पाणी सोडा, राहिलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा, अतिवृष्टी व मागील दुष्काळ निधी तात्काळ द्या, पाथरीत जलदगाड्यांना थांबा द्या. आदींसह विविध मागण्यांसाठी आज हे रस्ता रोकोचे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टिका केली व मागण्यांची पुर्तता लवकरच न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिला.

यावेळी नेताजी गायकवाड, नानासाहेब गायकवाड, ब्रम्हचारी गायकवाड, दयानंद चौधरी, श्रीकृष्ण पाटील, राजेंद्र फरताडे, पोपट पकाले, हनुमंत गायकवाड, सुरेश चौधरी, सचिन चौधरी, दयानंद पाटील, गुणवंत गायकवाड, व्यंकट गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, महादेव कांबळे, संतोष गुंड, बिभीषण गायकवाड, चंद्रहास गायकवाड, दत्ता पटाईत, अशोक गायकवाड, हनुमंत पाटील, अभिमन्यू गायकवाड, शकुंतला गायकवाड, विजयंता गायकवाड, मंदा गायकवाड, राधिका कांबळे, भामाबाई गायकवाड, इंदूबाई गायकवाड, शेशेराव गायकवाड, राजाराम गायकवाड, सहदेव गायकवाड, बालाजी गायकवाड, सर्जेराव गायकवाड, बाबुलाल मुजावर, अर्जुन गायकवाड, सुहास खळदकर, रणजित गायकवाड, धिरज गायकवाड, धनेश गायकवाड, रोहित गायकवाड, संपत गायकवाड, बापू कांबळे, संतोष जावळे, सुभाष गायकवाड, गौरव पाटिल, हर्षवर्धन पाटील, दत्ता लाड, दत्ता पाटील, रामराजे पाटील, विकास गायकवाड, मिटु गायकवाड, लक्ष्मण नाईकनवरे, विनोद गायकवाड, लिंबराज गायकवाड, महादेव विधाते आदींसह पंचक्रोशितील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *