fbpx

बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी रेशनिंगचा काळाबाजार समोर

उपळाई ठों येथे सापडला ४१ पोती गहु तांदुळ पकडला

बार्शी : बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या काळाबाजार हळु हळु उघड होत आहे पनवेल व बार्शीत रेशनधान्याचा काळाबाजार उघड झाल्यानंतर आज ग्रामिण भागातील उपळाई ठोंगे येथे शासनाची फसवणूक करून काळ्या बाजारात विकण्यासाठी एका घरात साठवुन ठेवल्या प्रकरणी पुरवठा निरिक्षक अभयकुमार साबळे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे .
यात संशयित आरोपी परवानाधारक दुकान क्र १९३ चे संतोष विलास गोडसे (रा. अरणगाव ता . बार्शी) तर त्या दुकानचे काटेचालक शिवाजी मारुती पांगरे (रा. उपळाई ठों ता. बार्शी) या दोघां विरुध्द गुन्हा नोंद झाला आहे .

फिर्यादीत म्हटले की उपळाई ठो येथे गणपत शंकर रगडे यांच्या घरामध्ये रेशनचा गहु तांदुळ धान्याचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता ८ कट्टे गहु व ३५ कट्टे तांदुळ असा पोत्यावर गव्हरमेंट आफ पंजाब असा शिक्का मारलेल्या पोत्यात असुन तो माल काटाचालक शिवाजी पांगरे याच्या ताब्यात असल्याचे निदर्शनास आले सदरचा माल हा रेशनचा असल्याचे खात्री पटल्याने याचा पंचनामा केला . रास्त भाव दुकान क्र १६० मौजे अरणगाव याला दुकान क्र १९३ उपळाई ठों येथील रास्त दुकान तात्पुरते स्वरूपात जोडले होते . तर सदर दुकानातील काटा चालक शिवाजी पांगरे याने उपळाई ठो पासुन सुमारे २ किमीवर असलेल्या गणपत रगडे यांना कोणतेही पुर्व कल्पना न देता त्यांच्या नवीन बांधकामात विनापरवानगीने ८ कट्टे गहु तर ३५ कट्टे तांदुळ पोत्यामध्ये भरून ठेवला होता त्यावर गवरमेंट ऑफ पंजाब व भारतीय खादय निगमचे शिक्के आहेत. सदर आरोपी विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास तालुका पोलिस करित आहेत .

पनवेल येथे ११० टन काळा बाजारा तील तांदुळ सापडल्यानंतर त्या पाठोपाठ बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काळदाते ट्रेडिंग कंपनीत रेशनिंगचा गहु तांदुळ आढळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तालुक्यातील उपळाई ठों येथे रेशनिंगचा गहु तांदुळ काळा बाजारात विकण्यासाठी ठेवलेला आढळुन आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे . बार्शी तालुक्यात विशेष करून लॉकडाऊनच्या काळात गोर गरिबांना आपल्या हक्काच्या गहु तांदुळा पासुन वंचित ठेवुन मोठ्या प्रमाणात बार्शी तालुक्यात रेशनचा केलेला काळा बाजार उघड होत असल्याने रेशनिंग व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थीत होत आहे ग्राहकांना माल न देता त्यांना ते आता काळा बाजार चढ्या भावाने व्यापार्‍यांना देत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *