fbpx

स्टेट बॅंकेत पाच हजार क्‍लर्क पदांची भरती ! जाणून घ्या सविस्तर माहिती

कुतूहल न्यूज नेटवर्क

सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वांत मोठी असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) देशभरातील शाखांमधील क्‍लर्क संवर्गातील ज्युनिअर असोसिएट्‌स (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) च्या 5000 + पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. सोमवारी, 26 एप्रिल 2021 रोजी बॅंकेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांकडून रेग्युलर आणि बॅकलॉगसह पाच हजारांहून अधिक क्‍लर्क संवर्गाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

एसबीआय क्‍लर्क भरती 2021 ऑनलाइन अर्ज

इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in जावून ऑनलाइन अर्ज करावे. ही प्रक्रिया मंगळवारी, 27 एप्रिल 2021 पासून सुरू झाली आणि उमेदवार 17 मे 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. मात्र, उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की त्यांना एसबीआयने निश्‍चित केलेली 750 रुपये अर्ज फी केवळ 17 मे पर्यंत भरावी लागेल. त्याच वेळी उमेदवार 1 जून 2021 पर्यंत भरलेल्या एसबीआय लिपिक भरती 2021 च्या अर्जाचा प्रिंटआउट घेऊ शकतील आणि सॉफ्ट कॉपी देखील डाउनलोड करू शकतील.

कोण अर्ज करू शकेल?

ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थांकडून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण केली आहे, ते एसबीआय क्‍लर्क भरती 2021 मध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे किंवा सेमिस्टरचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात; परंतु या उमेदवारांनी 16 ऑगस्ट 2021 पर्यंत त्यांच्या पदवी प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्‍यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *