कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: पांगरी (ता. बार्शी) जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रेखा राऊत यांचा सामाजिक व राजकीय कार्यात उल्लेखनीय कामाबद्दल महाराष्ट्र आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने पुणे येथे सन्मान करण्यात आला.
रेखा राऊत यांचा महाराष्ट्र आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मान
हा पुरस्कार सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालिताई चाकणकर यांच्या हस्ते सहकुटुंब देऊन राऊत यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी दैनिक नवराष्ट्र वृत्त समूहाच्या वतीने पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आदर्श लोकप्रतिनिधी व कोरोना महामारीच्या काळामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
(Rekha Raut honored with Maharashtra Adarsh Lok Pratinidhi Award)