कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील युवकांनी एकत्र येत तयार केलेल्या गावकारी सिनेमा प्रोडक्शन प्रस्तुत मराठी कॉमेडी वेब सिरीज मी नाय त्यातला या वेब सिरीज चे पोस्टर गावातील महादेव मंदिर या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले. या वेब सिरीजचा पहिला भाग 11 एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे. गावातील कलाकारांना एकत्र करत अमोल लोहार आणि मयुर कावळे यांनी मी नाय त्यातला ही वेब सिरीज सुरू केली आहे.
मी नाय त्यातला वेब सिरीजचे पोस्टर प्रदर्शित, कारी गावची पोरं वेधताहेत लक्ष
दिग्दर्शक अमोल लोहार, सहदिग्दर्शक लकी पाटील, ऋतुराज होवाल, प्रमुख निर्माता परीक्षित हाजगुडे, सहनिर्माता मारुती लोहार, पटकथा मयुर कावळे, संगीत रब्बाना लोहार, कला व लाईट गणेश रामपुरी, वेशभूषा मयूर काळे आदींनी या वेब सिरीज मध्ये आपली भूमिका पार पाडली आहे.
या वेब सिरीज साठी आम्हाला गावातील नागरिकांनीही भरपूर साथ दिली. मी नाय त्यातला ही वेब सिरीज सर्वांनी पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा – अमोल लोहार, दिग्दर्शक.
यावेळी अमोल जाधव, नाना बनसोडे, आसिफ मुलाणी, आदींनी मनोगत व्यक्त करत या वेब सिरीज साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी, माजी सरपंच इम्रान मुलाणी, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव, राजेश पवार, महेश करळे, वैभव डोके, अनिल कदम, मनोज माळी, राजेंद्र डोके, सुनील वाघमारे, विनायक ढेंबरे आदी उपस्थित होते.आभार मयुर कावळे यांनी तर सूत्रसंचालन अमोल लोहार यांनी केले.