कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित श्री शिवाजी विद्यालय व शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक महावीर भुसारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
कारीत विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा
तलाठी कार्यालय येथील ध्वजारोहण तलाठी महेश ढवळशंख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील अमृता माळी, सूर्यकांत पाटील, शशिकांत माळी, येडबा कोळेकर, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.