fbpx

धक्कादायक : निवृत्त पोलिसाकडून स्वतःच्या दोन मुलांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

कुतूहल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 15 जून: कौटुंबिक वादातून जन्मदात्या बापाने आपल्या दोन मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत (Navi Mumbai) घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या गोळीबारात त्यांचा दोन नंबरचा मुलगा विजय ज्याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली सेक्टर 2 मध्ये भगवान पाटील हे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी राहत होते. शिघ्रकोपी असलेल्या भगवान पाटील यांच्या स्वभावाला कंटाळून त्यांची दोन्ही मुले वेगळी राहत होती. शिल्लक गोष्टींवरून भगवान पाटील घरातील बायको पोरांबरोबर भांडण काढत असल्याने त्यांना सर्वजन वैतागले होते. अखेर भगवान पाटील यांच्या स्वभावात काहीच फरक पडत नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्यापासून वेगळे राहण्यास सुरुवात केली होती. 

विजयने गाडी सर्विस करण्यासाठी टाकली होती. त्याची माहिती देण्यासाठी तो वडिल भगवान यांच्याकडे आला होता. त्यानंतर सर्विसच्या पैशांवरून भगवान आणि विजय यांच्यात वाद झाला आणि काही कळायच्या आत भगवान यांनी विजयवर गोळीबार केला. यावेळी त्यांचा दुसरा मुलगा सुजय सुद्धा सोबत होता. विजयला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता त्यालाही गोळी लागली.

विजय पाटील याला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला त्वरीत ऐरोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुदैवाने दुसरा मुलगा सुजय पाटील याला गोळी चाटून गेली असल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान, या प्रकरणी आरोपी वडील भगवान पाटील याला रबाले पोलिसांनी अटक केली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *