कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी विजयकुमार मोटे
पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलची आढावा बैठक
पंढरपूर दि.01 सप्टेंबर : पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलची आढावा बैठक व तालुका कार्यकारीतील नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न.
पंढरपूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलची आढावा बैठक तसेच तालुक्यातील व शहर कार्यकारीनीतील नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान सोहळा पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भारत नाना भालके यांच्या शुभहस्ते व सोलापूर अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष फारूकभाई मटके यांच्या अध्यक्षतेखाली व ओबीसीचे प्रदेश सचिव लातीफभाई तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथील भारत नाना भालके यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

सदर आढावा बैठकिस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव ऍड. सलीम नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष मौलना अब्बास शेख,जिल्हा सरचिटणीस सादिक पठाण , बाळूभाई शेख, जिल्हा शहर उपाध्यक्ष अनिल उकरांडे,बार्शी शहराध्यक्ष इब्राहिम शेख, कार्याध्यक्ष शहनवाज शेख, शहर उपाध्यक्ष इरफान शेख, मोहोळ तालुकाध्यक्ष आझम शेख, साजिद बागवान आदी मान्यवर तालुक्यातील नेते व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक पंढरपूर तालुकाध्यक्ष पैगंबर शेख यांनी केले तर आभार पंढरपूर शहराध्यक्ष नासिर बागवान यांनी मानले.