कुतूहल न्यूज नेटवर्क
सुधारित आदेश : ग्रामीण भागाचे ‘अर्थचक्र’ आजपासून सुरू होणार..!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ‘ग्रामीण’ भागासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सोलापूर जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करणेबाबत.
सुधारित आदेश:
अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने/आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू राहतील.
• अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने / आस्थापना निर्देशानुसार सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू राहतील.पण या असतील अटी…
लेनची / गल्लीची लांबी १ कि.मी. पर्यंत असल्यास, बिगर अत्यावश्यक सेवेची प्रति कि.मी.५ दुकाने एका तारखेला उघडी राहतील, अशा प्रकारे त्यांना व्यवसायाचे दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांनी वाटप करावेत. पुढील प्रत्येक 1 कि.मी. लांबीकरीता आणखी ५ बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने ज्यातून विक्री करण्याचे साहित्य (उदा. हार्डवेअर, कपडे, भांडयाची दुकाने )इत्यादी वर्गवारीतील दुकाने दररोज उपलब्ध होईल असे नियोजन करावे. उदा. एखादा लेन/ गल्लीमध्ये १० दुकाने असल्यास ती दुकाने सम-विषम तारखेस उघडी ठेवता येतील. १५ दुकाने असल्यास पहिल्या दिवशी दुकान नं. १, ४, ७, १० इ. अशा क्रमांकाने दुकाने उघडी ठेवणेस परवानगी देण्यात येत आहे.
वरीलप्रमाणे बिगर अत्यावश्यक सेवेच्या दुकानांच्या आस्थापनांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी विहीतनिकषानुसार करून घेण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरण,नगरपालिका ,ग्रामपंचायत यांची राहील.
या सवलती प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्र (Contanimant Zone) यांना लागू असणार नाहीत.
वरील सर्व बाबींबाबत सर्व नागरिकांनी शासन निर्देशानुसार व वैद्यकिय सुचनांप्रमाणे तोंडाला मास्क वापरणे,प्रत्येक व्यक्तीस परस्परांपासून किमान सुरक्षित अंतर (Sacial Distancing) राखण्याचा दंडक पाळणे आवश्यक असेल तसेच सुरक्षित अंतर (Social Distancing)चे काटेकोरपणे पालन करवून घेण्याची जबाबदारी संबधित दुकानदाराची असेल.
ग्रामीण भागाचे अर्थचक्र आजपासून सुरू होणार..!
सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने सम-विषम तारखेनुसार सुरु करणार..! आजपासून सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सर्वांसाठी पेट्रोल पंप खुले होणार आहेत.सोलापूर शहर वगळता सोलापूर जिल्ह्यात सर्व अत्यावश्यक सेवा असणारी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत
१.सर्वांना पेट्रोल मिळणार
२. खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणीसाठी सर्व दुय्यम निबंधकाची कार्यालय सुरू राहणार
या मधून उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, शहर व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालय वगळण्यात आलेली आहेत
३. सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश
४. सम विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवा
५. एकाच रांगेत सलग पाच दुकाने सुरू नको
६.त्या- त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्हणजे ग्रामपंचायतींनी, नगरपालिकांनी, नगरपंचायतीनी याकडे लक्ष द्यावे
७. सोशल डिस्टन्स मेंटेन करण्याच्या सक्त सूचना
हे आदेश 17 मे च्या मध्यरात्रीपर्यंत लागू असतील.