fbpx

भगवंत केसरी कुस्ती स्पर्धेमुळे पैलवानात नवचैतन्य; मुख्य कुस्ती बरोबरीत

कुतूहल न्युज नेटवर्क
बार्शी: शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त भगवंत केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कुस्ती पैलवान संतोष जगताप (अकलुज) विरुद्ध पैलवान दत्ता नरळे (कोल्हापूर) यांची झाली असून दोन्ही पैलवानांना विजेते घोषित करण्यात आले. द्वितीय क्रमांक पैलवान प्रवीण घाडगे यांनी पटकावला. (Revival in wrestling due to Bhagwant Kesari wrestling competition)

प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपयांचे होते. दिनांक २७ फेब्रुवारीला भगवंत मैदान मॉडेल हायस्कुल येथे एक दिवशीय भगवंत केसरी कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, माजी अध्यक्ष गृहनिर्माण विभाग राजेंद्र मिरगणे, बार्शी नगरपालिका माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शहर शिवसेना प्रमुख दीपक आंधळकर, उपशहर प्रमुख इलियास शेख, शिवसेना तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष बबलू शेख, बापू तेलंग, जावेद पठाण, अन्वर मुजावर, प्रदीप खुने, समाधान सातपुते, अजय अवताडे, इब्राहीम काजी, सादिक बागवान, रमेश कुराडे, आप्पा गणदुरे, आयुब शेख, सलीम शेख, रामेश्वर गवारे, महेश विजागत, राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पंच म्हणून पैलवान शरद घाडगे, नाना भोसले, आबा पवार, बालाजी भोकरे, दत्ता भोसले, मिटू कदम, शिरू भोसले, धनाजी नवले, सचिन शिंदे, नवनाथ इंगळे, मधुकर चव्हाण ,प्रभाकर गवळी, बाळू चव्हाण यांनी पंच कमिटीचे काम पाहिले. कुस्तीचे  निवेदक म्हणून पैलवान दिनेश गवळी व पैलवान तानाजी मदने यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *