दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड मध्ये रिमझिम पावसाला सुरुवात
निगडी : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये काल दिवसभर ढगाळ वातावरण होता आणि आजही सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाला होता . अखेर शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
काल पर्यंत पुणे येथे 31.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची आणि 18.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. मागच्या आठवड्यापासून पुण्यात कडाक्याची थंडी वाढत होती. अशात डिसेंबर महिन्यात पुणेकरांना पावसाचाही सामना करावा लागत आहे. शिवाय काही तरूण मंडळी पावसाचा आनंदही घेताना दिसत आहेत.