fbpx

उपरी येथील अतिक्रमणाच्या विरोधात रिपाईचे उपोषणास प्रारंभ

पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर अतिक्रमणाच्या निषेधार्थ उपोषण सुरू

कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील दलित वस्ती स्मशानभूमीजवळ असलेल्या गायरान जमिनीवर गावातील काही समाजकंटकांनी अतिक्रमण केल्यामुळे दलित समाजाला जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. याबाबत सन 2013 पासून शासनाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने देऊनही याबाबत आजतागायत विचार होत नाही. त्यामुळे आरपीआय आठवले गट च्या वतीने व आघाडी प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन उपरी गावचे शाखाप्रमुख दत्ता वाघमारे अनिल सोनवणे आदी ग्रामस्थांनी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

उपरी येथील गट नंबर 447 मधील दोन हेक्टर बहात्तर आर (७ एकर ) हि गायरान शेतजमीन दलित समाज व मुस्लीम समाजाची दफनभूमी असून गावातील काही गाव गुंड समाजकंटक यांनी या जागेवर अतिक्रमण करून गेली वीस वर्ष बागायत शेती करून उत्पादन घेत आहेत. वारंवार दुःखद घटनेच्या वेळी समाजातील लोकांना वेठीस धरून त्यांना त्रास व हाल सहन करावे लागत आहे. यातून मुक्ती मिळावी म्हणून आज रोजी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *