fbpx

जेऊर ते इंगळगी रस्ता नूतनीकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करू : संभाजी आरमार

कुतूहल न्यूज नेटवर्क

अक्कलकोट प्रतिनिधी : जेऊर ते इंगळगी हा रस्ता महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळे येथील वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शाळा,कॉलेज विद्यार्थ्यांना,नोकरीसाठी ये – जा करणाऱ्या नोकरदारांना त्रासदायक ठरत आहे. रस्ता अतिशय खराब झाल्याने जेऊर ते अक्कलकोट मार्गे सोलापूर असा २० कि.मी चा जास्तीचा प्रवास करावा लागत आहे. एखादी व्यक्ती (रुग्ण) दवाखान्यात घेऊन जायचे असल्यास हा रस्ता पार करणे फार जिकिरीचे,जोखमीचे ठरत आहे. तसेच खड्डे चुकवण्यासाठी वाहने आपला मार्गदिशा सोडून दुसऱ्या मार्गाने जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तरी या रस्त्याचे नूतनीकरणाच्या आर्थिक मंजुरीची चौकशी करून रस्त्याचे समक्ष पाहणी करून सर्वसामान्य जनतेचे होणारे नुकसान,अपघात टाळण्याकरिता हा रस्ता तात्काळ उत्कृष्ट पद्धतीने डांबरीकरण करण्यात यावे. अन्यथा जेऊर-इंगळगी येथील नागरिकांना,लोकप्रतिनिधींना घेऊन नाईलाजास्तव आंदोलन करण्यात येईल. असा इशारा संभाजी आरमार संघटनेकडून जि.प.उप विभागाचे उपअभियंता ए.ए.खैरदी यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आले. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय (सोलापूर) व तहसीलदार कार्यालय (अक्कलकोट) यांच्या अधिकृत इमेल आयडीवर देखील मेलद्वारे पाठवण्यात आलेले आहे अशी माहिती संभाजी आरमार अक्कलकोट तालुका प्रमुख नारायण माने यांनी दिले. याप्रसंगी निवेदन देताना उपप्रमुख नितीन मोरे, सचिव मुकिंद कोळी, संघटक अमित कदम, विद्यार्थी प्रमुख अभिषेक माने, विद्यार्थी उपप्रमुख तुषार व्होरडे, लक्ष्मण कलमदाणे, सैफअली कोरबू, निखिल माने, सुदर्शन जाधव, करीम मुजावर, महांतेश सातपुते, सागर कोळी, दशरथ जाधव, अमीन कोरबू, राजू अत्तार, सागर सुतार, भीमाशंकर सुतार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *