fbpx

बार्शीत दरोडा टाकून चार लाखांचा ऐवज लंपास

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी दि. १५ :  चाकूचा धाक दाखवत अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शहरातील वाणी प्लॉट येथे सोमवारी मध्यरात्री हि घटना घडली. शहर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी निवृत्त मुख्याध्यापक गजेंद्र गेना जाधव (वय 68 वर्षे रा. वाणी प्लॉट बार्शी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी घरातील इतर लोक जेवणखान करुन रात्रौ 11 च्या सुमारास घरात झोपले. ते पत्नीसह हाॅलमध्ये झोपले होते व घरातील इतर लोक बेडरूम मध्ये झोपलेले होते. मध्यरात्री 2 वाजण्याच्या  सुमारास फिर्यादीची झोपमोड झाल्यामुळे ते झोपेतून उठले होते. तेव्हा त्यांनी खोलीमधील झिरो बल्बचे उजेडात पाहिले असता घराच्या हॉलमध्ये त्यांच्या जवळ दोन इसम उभे असल्याचे दिसुन आले. त्यापैकी एकाच्या हातात लाकडी दांडके व चाकू होता व त्यालगत उभा असलेल्या इसमाच्या हातात बॅटरी होती. दरम्यान त्यांची पत्नी हि झोपेतून जागी झालेली होती. तेव्हा त्यांच्या जवळ एक इसम हातामध्ये लाकडी दांडके घेवुन थांबलेला होता व इतर दोन इसम हे हाॅलमधील कपाटाजवळ उभे असलेले दिसले.

फिर्यादीजवळ असलेल्या पैकी एकाने त्यांना चाकुचा धाक दाखवुन, लाकडी दांडके उगारुन चुप बैठने का, हिलने का नही, तुम्हारे पास पैसा है, तुम हिले तो बुढ्ढी को मार देंगे असे म्हणुन धमकावले व हातातील लाकडी दांडके उजव्या पायाचे मांडिवर मारले. यामुऴे फिर्यादी घाबरुन दिवाणवर जाऊन झोपले. तेव्हा हाॅलचे कपाटाजवळ उभे असलेल्या दोघांनी कपाटाचा दरवाजा उचकटुन कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढुन घेतली व इतर सामान खाली अस्ताव्यस्त फेकुन दिले.

दरोडेखोर पाठीमागचे दाराने घराबाहेर गेले जाताना फिर्यादीचे मोबाईल ही घेऊन गेले व जाताना कंपाउंड लगत टाकुन दिले. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरोड्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. श्वानपथक व ठशे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.मात्र श्वान चोरट्यांचा माग काढण्यात अपयशी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *