बार्शी: मळेगांव ता.बार्शी येथे सुयश विद्यालय तांदुळवाडीचा विद्यार्थी रोहित गाभणे याने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत २५२ गुण घेऊन यश संपादन केल्याबद्दल श्री शिवजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ व सावता परिषद बार्शी यांच्या वतीने रोहित गाभणे याच्या निवासस्थानी उद्योजक सागर माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मळेगांव येथे रोहित गाभणे याचा सत्कार
यावेळी सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, मुलाचे पालक शंकर गाभणे यावेळी उपस्थित होते.
या यशाबद्दल श्री शिवाजी तरूण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, अध्यक्ष अंकुश माळी, सरपंच ज्योती माळी, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, माजी सरपंच सिद्धेश्वर मुंबरे, उद्योजक संतोष निंबाळकर, ग्रा.प. सदस्य प्रल्हाद दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीराम निंबाळकर, गिरीश माळी, शंकर सुरवसे यांनी आभिनंद करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.