उपरी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी केले होते
भरीव लेखी आश्वासन दिल्याने आरपीआयचे उपोषण मागे
कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे
पंढरपर : पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील गायरान जमिनीवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे अतिक्रमण काढून घेण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव युवा आघाडीचे नेते दीपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली उपरी येथील अनिल सोनवणे, दत्ता वाघमारे व आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर येथील तहसिल कार्यालया समोर 4 ऑगस्ट पासूूून आमरण उपोषण सुरू केले होते.याची दखल घेऊन महसुल प्रशासनाच्या वतीने भरीव लेखी अश्वासन दिल्यामुळे हे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले आहे.
उपरी येथील गायरान गावठन गट नं 447ही जमीन स्मशानभूमीसाठी सातबाराच्या इतर ह्क्कात नमुद आहे.या जमिनीवर गावातील बुआ लोखंडे,पोपट लोखंडे,बाळासाहेब नागने यांनी अतिक्रमण केल्याचे दिसुन आले आहे.त्या व्यतिरिक्त लगत असणारे गट नं 450, 448, 449, 450, 434, 435, 428, 427, 433, 437, 438, 446, 445, 460 या लोकानीही अतिक्रमण केल्याचे नाकारता येत नाही.त्यासाठी या सरकारी गट नं. 447 ची शासकीय मोजणी करुन हद्द निश्चित करुन गायरान जमिनी मधील अतिक्रमण काढून घेण्याबाबत संबधित कार्यालयास कळविण्यात आल्याचे लेखी आश्वासना मध्ये नमुद केले आहे. याबाबतची मोजणी येत्या 26अगस्ट रोजी करण्यात येणार असुन योग्य न्याय मिळणार हे निश्चित झाल्यामुळे ते आमरण उपोषण मागे घेतल्याचे दिपक चदनशिवे यानी कळविले आहे .