बार्शी: लीफ आर्टचे (leaf art) कोणतेही प्रशिक्षण न घेता ग्रामीण भागात राहून एक २० वर्षीय तरुण आपला आगळा वेगळा छंद जोपासत आहे. आजपर्यंत त्याने शेकडो पिंपळाच्या पानावर चित्र कोरले आहेत, पांगरी (ता.बार्शी) येथे वास्तव्यास असणारा रोहन मोहन गवळी असे त्या युवकाचे नाव आहे.
रोहन ही कला काही महीन्यापासुन जोपासत आहे, सुरुवातीला नकाच्या साह्याने टाईमपास म्हणून पिंपळाच्या पानांवर नक्षीकाम करायचा नंतर ब्लेड चा वापर करून हळूहळू रोज वेगवेगळे पिंपळाच्या पानावर चित्र कोरु लागला. दररोज वेगवेगळे चित्र कोरून आज तो एक दर्जेदार लीफ आर्टिस्ट झाला आहे व सध्या त्याचा या कलेला खूप मागणी आहे.
कुतूहल शी बोलताना रोहन काय म्हणाला ?
काही तरी आगळे वेगळ करायची आवड मला पहील्या पासुनच आहे, कधी- कधी वाटते टाईमपास म्हणून जोपासलेली कला आज मला प्रसिद्धी ही देते आणि माझं करियर ही बनवत आहे. हा छंद जोपासत मी चित्र पण काढतो, छोटे मोठे लेख ही लिहायचे प्रयत्न करतो व तसेच कवीता देखील करतो. मला माझ्या घरच्या व बाहेरच्या देखील लोकांचा समर्थन मिळत आहे. म्हणून मी रोज काहीतरी वेगळ करण्याचा प्रयत्न करतोय व कायम करतच राहील. फक्त असाच कायम समर्थन रहावा आशी ईच्छा आहे.
रोहन शी येथे संपर्क करा
रोहन मोहन गवळी,
रा. पांगरी, ता: बार्शी, जि: सोलापूर
Insta I’d : rohanmgavali
Mobile no. : 8459187793