fbpx

साजन प्रकाशने रचला इतिहास; Olympic मध्ये थेट प्रवेश करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर

कुतूहल न्यूज नेटवर्क
शनिवारी साजन प्रकाश या स्वीमरनं एक इतिहास रचला. रोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेटे कॉली ट्रॉफीमध्ये पुरूषांच्या गटात २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत साजननं १ मिनिट ५६.३८ सेकंदाची वेळ घेत क्वालिफाय करणारा पहिला
भारतीय स्वीमर बनण्याचा मान मिळवला आहे.

साजननं ही फेरी १ मिनिट ५६.४८ सेकंदाच्या ए क्वालिफिकेशन मार्कपेक्षा चांगली आहे. यापूर्वी सहा भारतीय स्वीमर्सनं २०१९-२० च्या ऑलिंपिक स्पर्धेत क्वालिफिकेशन कालावधीत बी क्वालिफिकेशन मिळवलं होतं. बी क्वालिफिकेशन एक वाईल्ड कार्ड एन्ट्री आहे. यापूर्वी अनेक भारतीय स्वीमर्सनं ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. परंतु कोणत्याही स्वीमरला थेट ए क्वालिफिकेशन मार्क तोडून थेट क्वालिफाय करण्यात यश मिळालं नव्हतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *