कुतूहल न्यूज नेटवर्क
उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समीत ठक्करला २४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्याला आज कोर्टापुढे पुन्हा हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा आरोप समीत ठक्करवर आहे. त्याला २० ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर त्याला २४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.