fbpx

मळेगाव या गावाला दिली संजय तांभोळकर यांनी सदिच्छा भेट

कुतूहल न्यूज नेटवर्क

मळेगाव प्रतिनिधी: मळेगाव ता.बार्शी यांची यशोगाथा पाणलोट विकास संस्थेने राज्यस्तरीय सहनियंत्रण व मूल्यमापन संस्था म्हणून मळेगावची निवड करण्यात आली,या गावाची पाणलोट मध्ये केलेल्या विकासकामांची यशोगाथा राज्यस्तरावरून पुढे केंद्र स्तरावर प्रतिनिधित्व करायला पाठवण्यासाठी,श्री मळेगावने पाणलोट व्यवस्थापनने केलेल्या विकासकामांची तसेच श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाने केलेल्या सामाजिक कामाची पहाणी करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिक्स ऍंड इकॉनॉमिक्स पुणे या संस्थेचे श्री संजय तांबोळकर यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी ग्रा.प.सदस्य संजय माळी, दशरथ इंगोले,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,कृषी सहाय्यक दिनकर फड,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष गाभने, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, रमेश वाघ, ग्रामपंचायतचे लिपीक सुरेश कांबळे, आरोग्य कर्मचारी रुकुम आडगळे, बाळासाहेब बडदापुरे, दत्तात्रय इंगोले आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *