fbpx

संतोष सूर्यवंशी यांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड

कुतूहल न्यूज नेटवर्क 
बार्शी:
बार्शी जनता टाइम्सचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार संतोष सूर्यवंशी यांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली. त्यामुळे, बार्शी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्यावतीने बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी आणि संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्याहस्ते पत्रकार संतोष सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.
बार्शीच्या नाळे प्लॉटमध्ये राहणारं, पण तालुक्याच्या विविध क्षेत्रातील व्यक्तीशी नाळ जोडणारं व्यक्तीमत्व म्हणजे संतोष सूर्यवंशी, जुन्यांपासून ते नव्यांपर्यंत सर्वच राजकीय व्यक्तींशी स्नेहबंध असून अनेकदा माझ्यासारख्या नवख्यांनाही ते मार्गदर्शक करतात, असेही नगराध्यक्ष तांबोळी यांनी सांगितले.
डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी या संघटनेची स्थापन करण्यात आल्याचे राजा माने यांनी सांगितले. तसेच, पत्रकार हा सर्वांचाच असतो, पण कुणाचाच (राजकीय पक्ष) नसतो… या वाक्याला शोभणारं व्यक्तीमत्व म्हणजे संतोष सूर्यवंशी आहेत, असेही माने यांनी म्हटले.
पत्रकारितेत काम करत असताना अनुभवाची मोठी शिदोरी लाभली. त्यातच, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्याशी जवळून संबंध आला, आपल्या मित्रांच्या कामाला धावून येणारं व्यक्तीमत्व म्हणजे राजा माने होय, हे कित्येक बार्शीकरांनी अनुभवलंय. त्यांनीच, संघटनेत सदस्यपदी जबाबदारी दिली असून ती समर्थपणे पार पाडेल, असा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
संतोष सूर्यवंशी यांनी नवीन डिजिटल मीडियातील पत्रकांरांना आपल्या प्रदीर्घ अनुभवातून मदत आणि मार्गदर्शन करावे, अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष अजय टिंकू पाटील यांनी केली. दरम्यान, याप्रसंगी लोकमतचे शहाजी फुरडे पाटील, लोकमत ऑनलाइनचे मयूर गलांडे, संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य विनोद ननवरे, विजय कोरे, अध्यक्ष अजय पाटील, सचिव दिनेश मेटकरी, खजिनदार धीरज शेळके, यांसह सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सचिव दिनेश मेटकरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *