बार्शी : कुतूहल न्यूज नेटवर्क
सत्यजित जानराव यांची सिव्हील राईट्स प्रोटेक्शन सेलच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड
सिव्हील राईट्स प्रोटेक्शन सेल (सि.आर. पी.सी.) या सघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सत्यजित जानराव यांची निवड एकमताने करण्यात आली असुन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राचार्य डाॅ. टी.जी. गेडाम यांनी ही निवड केली आहे. सत्यजित जानराव हे डॉ.आंबेडकरी चळवळीतील प्रामाणीक कार्यकर्ते असुन देशमाझा लाईव्ह 24 युट्यूब चॅनेलचे संपादक आहेत.
त्याच्या निवडीबदल सी.आर. पी.सी. चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलींद जीवने यानी त्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच सी.आर. पी.सी. चे राष्ट्रीय पदाधिकारी , राष्ट्रीय उपाध्यक्ष व फिल्मस्ट्रार डाॅ. फिरदोस श्राफ, उप जिल्हाअधिकारी व राष्ट्रीय सचीव एन.पी. जाधव, राष्ट्रीय सचिव सुर्यभान शेडे , संपादक व राष्ट्रीय सचीव विजय बौद्ध , राष्ट्रीय समन्वयक वंदना जीवने , राष्ट्रीय सहसचीव अमित कुमार पासवान ,तसेच राष्ट्रीय महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदना जीवने, राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ मनीषा घोष , राष्ट्रीय कार्याध्यक्षा डॉ. किरण मेश्राम , राष्ट्रीय उपाध्यक्षा ममता वरटे, रेणू किशोर इत्यादी मान्यवरानी त्यांचे स्वागत करूण शुभेच्छा दिल्या आहेत’ त्यांच्या निवडी मुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहें.