बार्शी:-सौ.माई सोपल माध्यमिक विद्यालय.सुभाष नगर, बार्शी येथे आनंद बाजार आयोजित करण्यात आला होता.सदर आनंद बाजार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.राजेश उकिरडे सर होते तर या आनंद बाजाराचे उद्घाटन श्री.बाळकृष्ण उमाटे सर यांनी केले.
सौ.माई सोपल माध्यमिक विद्यालय बार्शी येथे आनंद बाजार साजरा
विद्यार्थ्यान्ना व्यवहारीक ज्ञान मिळावे ,भविष्यामध्ये त्यांना व्यवसाय करावयाचा असेल तर त्याचे बालकडू हे प्रशालेमधुनच मिळाले पाहीजे तसेच प्रशालेमधील विविध विषयांचे ज्ञान हे कृतीयुक्त व ज्ञानरचानावादी मिळाले पाहिजे हे आनंद बाजाराचे मुख्य उद्देश होते.
या बाजारामध्ये ५ ते ७ चे विद्यार्थी विक्रेते बनले होते तर ८ ते 10 चे विद्यार्थी ग्राहक बनले होते ,या बाजारामध्ये एकुण ५० स्टॉल होते आणि एकुण रु.११३५१ ची आर्थिक उलाढाल झाली,या मधून विद्यार्थ्यांनी आर्थिक व्यवहार कसे करावे याची माहिती मिळाली नफा-तोटा,गणिताची मूलभूत क्रिया याची जाणीव विद्यार्थ्यान्ना झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संतोष सालुंखे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेमधील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले,तसेच कार्यक्रम यशस्वी रित्त्या पार पाडल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.सतीश सातपुते सरांनी सर्वांचे कौतुक केले.