बार्शी प्रतिनिधी : कुतूहल न्यूज नेटवर्क
वाचवले ३० प्रवाशांचे प्राण ; छत्रपती ग्रुपच्या मावळ्यांनी दाखवले माणुसकीचे दर्शन
बार्शी : आज बार्शी येथे मुसळधार पावसामुळे बार्शीतील प्रत्येक ओढ्याला नदीचे रूप आले होते, त्यामध्ये बार्शी – परभणी जाणारी एसटी बस लातूर रोड येथे असलेले साई होंडा शोरूमच्या समोर ही एसटी बस बंद पडली व त्यामध्ये ३० ते ३५ प्रवासी असल्याचे कळाले शोरूम मधून जगदाळे यांचा फोन छत्रपती ग्रुप अध्यक्ष टिंकू पाटील यांना आला.आपण काहीतरी मदत करा व एसटीमधील प्रवासी यांना सुखरूप बाहेर काढा अशी विनंती केली असता कोणत्याही क्षणाचा न विचार करता छत्रपती ग्रुप अध्यक्ष टिंकू पाटील हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले.त्यावेळी लोकमान्य येथे अग्निशामक दलातील सहकारी तेथे आले होते लोकमान्य चाळींमधील मित्रपरिवार देखील तेथे होता परंतु जाण्याचे धाडस कोणीही करत नव्हते.
परंतु टिंकू पाटील आल्यानंतर सर्वांना बळ मिळाले व टिंकू पाटील यांनी पुढाकार घेऊन दोरच्या आधारे पकडून सर्वजण पुढे जात होते एका ठिकाणी लाईटच्या पोलला दोर घट्ट बांधून सर्व व जण शोरूम पर्यंत पोहोचले त्यानंतर एस.टी तील सर्व नागरिक भयभीत होते त्यांना दिलासा देत नगरपालिकेच्या जेसीबीच्या आधारे सर्व महिला व माणसे यांना सुखरूप शोरूम मध्ये पोहोच करण्यात आले.यामध्ये छत्रपती ग्रुप चे पदाधिकारी अग्निशामक दलातील सदस्य तसेच होंडा शोरूम मधील सदस्य व लोकमान्य चाळ येथील मित्रपरिवार या सर्वांनी मदत केली व एसटी मधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले.