कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती अंगणवाडी क्र.२ मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
मळेगाव येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये पहिली मुलीची शाळा सुरू करून ज्ञानदान देण्याचे महान कार्य त्यांनी केले. पुढे पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली, अस्पृश्य समाज्यातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या, सावित्रीमाई शिकविण्याकरिता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करताना त्यांना अनेक कटू अनुभवाना सामोरे जावे लागत असे.
शिक्षणासाठी त्यांनी अंगावर शेण, दगड, कचरा झेलले, त्यांचे कार्य केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित राहीले नाही तर त्यांनी विधवांची परिस्थिती सुधारावी, स्त्रीभ्रूण हत्या थांबाव्या म्हणून देखील त्यांनी काम केले व त्यांनी आश्रमाची उभारणी केली. दलित, अस्पृश्य समाजकरिता त्यांनी काम केले. पतीच्या निधनानंतर देखील त्यांनी सामाजिक कार्य सुरूच ठेवले व त्या सतत समाजाचे ऋण फेडत राहिल्यात.
सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील कुटूंबनियोजन करणाऱ्या मातांचा माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अंगणवाडी पर्यवेक्षक शेख, ग्रा.प.चे माजी सदस्य श्रीमंत पाडुळे, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, अंगणवाडी सेविका, सविता सरवदे, आश्विनी दळवी, अंगणवाडी मदतनीस सुरेख सुतकर, लता थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.