fbpx

श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: आसिफ मुलाणी
बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात 6 जून रविवार रोजी “शिवस्वराज्य दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या मुख्य कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एस. पाटील होते.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. आजच्या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र गीतांची ध्वनिफित लावून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने गूगल मीट ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून इतिहासाचे अभ्यासक मा.प्रा. विकास मुकुंद देशमुख (चाकण शिक्षण मंडळाचे) कला व वाणिज्य महाविद्यालय, चाकण, ता. खेड, जि. पुणे. यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व वर्णन करून शिवरायांच्या कार्याचे व पराक्रमाचे काही प्रसंगही उलगडून दाखवले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विशाल लिंगायत यांनी केले. तसेच अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. पाटील यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ एच. एस. पाटील, कार्यालयीन अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा विशाल लिंगायत, वाघे डी. ए. पवार. सी. पी., सुरेश दराडे, जितेंद्र गाडे यांच्यासह सर्व सहशिक्षक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंगचे (सामाजिक अंतर राखून) पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *