शाळा हे समाजमानाचे संस्कार केंद्र,शाळा हे समाजमानाचे उत्तम केंद्र आहे.बालकामध्ये योग्य ,अयोग्य संस्काराचा प्रभाव शाळेमुळे घडतो.आज ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत.समाजाच्या सांस्कृतिक गरजा ,समाजाचे औद्योगिकरण,विज्ञानाची प्रचंड उन्नती याच्यामुळे ज्ञान विस्तारलेले आहे,हेच नाही तर समाजाला सार्वत्रिक शिक्षणाची गरज आहे.शाळेने समाजाचे प्रतिनिधित्व करावे,अशी अपेक्षा शाळेकडून समाज करतो.फ्रॉबेल या विचारवंतांच्या मते-शाळा म्हणजे विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन व्यक्ती व्यक्तीत विशिष्ट आणि घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्याच्या कल्पनेने केले जाणारे संक्रमण ज्या ठिकाणी होते,ते ठिकाण म्हणून समाज व शाळा यांचा संबंध हवा.यासाठी शाळेची भूमिका खूप महत्त्वाची असते.
शाळा
शाळा ही संस्काराचे ,तिच्या रक्षणाचे,प्रसाराचे प्रभावी साधन आहे.भारतीय लोकशाहीत तर शाळेची मोठी जबाबदारी आहे.शाळेने भारतीय प्रास्तविकेतील स्वातंत्र,समता,बंधुता व न्याय यामुल्यांच्या माध्यमातून सामाजिक परंपरेचे पालन करावे.भारतीय संस्कृती सण उत्सव यांनी ओथंबलेली आहे.ती निसर्गाशी निगडीत आहे.तिला वैज्ञानिकांची जोड आहे म्हणून आपण सणांची आतषबाजी त्या त्या ऋतुप्रमाणे करतो.या सण उत्सवातून आपण शाळेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा उत्तम प्रकारे ठेऊ शकतो .शाळा हे समाजाला ऐक्यात बांधणारे शस्त्र आहे ते इतर कोणी करूच शकत नाही.परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे,तोच नियम शाळेच्या बाबतीत लागू होतो हेशाळेने मानले पाहीजे.लोकसंख्यावाढ व त्याचा समाजावर होणारा परिणाम,शाळेमध्ये होणारे बदल, त्यांचा दर्जा याचा विचार केला पाहीजे.जुने लोक रूढींना धरूनच राहण्याचा आग्रह करतात तर तरुणांना काहीतरी नवे हवेसे वाटते.उदा.अंधश्रद्धा व वैज्ञानिक सत्याग्रह शाळा हि समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करते. अज्ञानाला सुज्ञान करते.सुसंस्करीताचे धडे देते.चांगले काय, वाईट काय याचा परिचय देते.आज अंधश्रद्धेचे खूप पेव फुटले आहे.त्याची सत्यासत्यता वैज्ञानिक दृष्टीकोनातून पटवून देण्याचे कार्य केवळ शाळाच करते.
म्हणजे शाळा हाच समाजाचा खरा मार्गदर्शक आहे.आज जग चंद्रावर जात आहे आणि हा समाज अंधश्रद्धेच्या दुष्ट चक्रातून सावरत आहे. याला जोड दिली ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून पडताळण्याची आणि हे काम समाज उपयोगी शाळेने अगदी चोख बजावले आहे.शाळेत आपण प्रयोगातून अनेक गोष्टी चिकित्सक वृत्तीने पाहतो व समाजाला एखाद्या वाईट प्रवृत्तीपासून घटनेपासून वाचवतो .आज समाजातील तरुण पिढी अंधश्रद्धेला मानायला तयार नाही हे केवळ शाळेचा क्रांतिकारक परिणाम म्हणावा लागेल.बुवाबाजी, जादूटोणा,जंतर मंतर या गोष्टीची जागा शाळेने घेऊन स्वयंघोषित ,प्रगल्भ,विज्ञान निष्ठ भारत घडविण्याचा जणू घाट च घातला आहे हे भारताची सत्ता बनवण्यास उपयुक्त आहे.समाजाला विघातक वृत्तीला ठार न देता एका काळाच्या व जीवनाच्या संदर्भात प्रत्येक गोष्ट तपासून पाहावी.
विद्यार्थ्यांनी काय स्वीकारावे याबद्दल शाळेने मार्गदर्शन च केलेले आहे.शालेय अभ्यासक्रमातून सामाजिक उद्देशांची पूर्ती केली जाते,म्हणूनच अभ्यासक्रम आखताना वेळोवेळी समाजातील परिवर्तन काय आहेत याचा विचार केला जातो.समाजाच्या गरजांचा व समस्यांचा औद्योगिकीकरण मूळे निर्माण झालेल्या विविध समस्या ,तांत्रिक शिक्षण,व्यवसाय शिक्षण,त्याची गरज,आर्थिक समस्या,भाषिक समस्या याचा विचार करावा.अभ्यासक्रमाचा व्यक्तीच्या जीवनाशी घनिष्ट संबंध असला पाहिजे.त्याने व्यक्तीच्या भविष्य काळासाठी तयारी करून दिली पाहिजे.अभ्यासक्रम परिवर्तन शील व प्रगतिशील असावा.शाळेने व्यक्ती व समाज यांच्या जीवनात समन्वय आणावयास हवा.शाळा म्हणजे विद्यार्थी नावाच्या फुलवेलीला बहर आणणारी जागा.योग्य खतपाणी घालून ही फुलवेल बहर वणारा माळी म्हणजे शिक्षकआणि या सर्वांचा सुगंध म्हणजे हा समाज असा अनोखा हा योग !
लेखक : कांबळे चंद्रकांत हरीबा जि.प.प्रा.शाळा गुगळगाव वाडी ता. उमरगा जि.उस्मानाबाद