बार्शी: बार्शी तालुक्यातील चिंचोली सारख्या ग्रामीण भागातून अत्यंत खडतर परिस्थिती मधून चिंचोलीचे सुपुत्र प्रदीप वसंतराव शिंदे यांनी पोलिस खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून ६३ व्या रँकने घवघवीत यश मिळविले आहे.
पोलीस दलामध्ये दैनंदिन कामकाज तसेच निवडणूक बंदोबस्त व कोरोना कालावधीत कठीण परिस्थीतीत कामकाज करून त्यातुनही वेळात वेळ काढून परीक्षेसाठी अभ्यास व तयारी करून प्रदीप शिंदे यांनी हे यश संपादन केले आहे. तरी या यशाबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक सुर्यकांत पाटील यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.