कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: मळेगाव ता.बार्शी येथील उद्योजक राजकुमार मुंबरे यांची कन्या ऋतुजा मुंबरे हिची अमृतसर येथे होणाऱ्या सिनियर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ती सध्या देवगिरी कॉलेज औरंगाबाद येथे बी.सी.एस. च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
मळेगावातील ऋतुजा मुंबरेची तलवारबाजीसाठी निवड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील साई स्पोर्ट्स मध्ये संपन्न झालेल्या निवड स्पर्धेमध्ये ऋतुजा मुंबरे हिने विजय प्राप्त करून यश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी तीला प्रा.उदय डोंगरे, स्वप्नील तांगडे, सागर मगरे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीसाठी व पुढील स्पर्धेसाठी सरपंच ज्योती माळी, उपसरपंच धीरज वाघ, सिद्धेश्वर मुंबरे, संजय माळी, बाळासाहेब माळी, अशोक माळी, राहुल पावटे, गुणवंत मुंढे, शिवाजी पवार, ज्ञानेश्वर माळी यांनी शुभेच्छा दिल्या.