कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील सुरज जयंत काळे याची कृषी सहाय्यक पदी निवड झाली. सुरज काळे याने प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयात तर कृषीचे शिक्षण परभणी कृषी विद्यापीठात पूर्ण केले. काळे याच्या निवडीने त्याच्यावर ग्रामस्थ, मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सुरज काळे यांची कृषी सहाय्यकपदी निवड
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount