कुतूहल न्यूज नेटवर्क
न लढणाऱ्या शेतकऱ्यांचे पिकविमा कंपन्यांनी हजारो कोटी लुटले शंकर गायकवाड यांचा आरोप
कळंब, दि.५ एप्रिल : मागील बारा वर्षा पासून आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे येथे कृषी आयुक्तालय व विविध विमा कंपनीच्या कार्यालयात आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत परंतु विमा कंपन्यांकडून नुसतेच आंदोलन करणाऱ्या किंवा लढणाऱ्या शेतकऱ्यांच कायदेशीर पुर्ण विमा भरपाई दिली जाते परंतु इतरांच्या खातेवर मात्र तुटपुंजी भरपाई जमा करून हजारो कोटी रूपये न लढणाऱ्या शेतकऱ्यांचे लुटले जात असल्याने शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात लढा दिला पाहीजे असे उद्गार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी कळंब तालुक्यातील शेलगाव (जहागीर) येथे झालेल्या सभेत काढले.
याही वर्षी विविध राज्य स्तरीय आंदोलनानंतर शासन व कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मंजूरीचे आदेश काढले परंतु विमाभरपाई १५ एप्रिलच्या आत हेक्टरी काढनी पुर्व १६७०० रु. तर काढनी नंतरच्या नुकसानीसाठी २७५४० रू. देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे जर शेतकऱ्यांच्या खातेवर जमा केली नाही तर १६ एप्रिल रोजी मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचेही यावेळी बोलताना शंकर गायकवाड यांनी सांगीतले.
तसेच ज्या शेतकऱ्यांना यापुर्वी विमा कमी मिळाला किंवा मिळालाच नाही अशा राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी ९७६७६८४९३४ या गायकवाड यांच्या मोबाईलवर संपर्क करावा असे आवाहनही गायकवाड केले. यावेळी अध्यक्ष बाबूराव तवले, शरद भालेकर, मुकिंदा पेजगुडे, किसनराव शिनगारे, उपसरपंच पांडुरंग सोनार, सर्जेराव तवले, केशवराव तवले, जगन्नाथ बांगर, नरहरी मोरे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक बाबुराव तवले, सुत्रसंचलन नटेश तवले तर आभार दत्तात्र्य तवले यांनी मानले.