कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : मळेगावचे सुपुत्र व श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे मार्गदर्शक शंकर विटकर यांची महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चु कडू यांनी प्रहार संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड केली. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या १० वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली. या निवडीबद्दल श्री शिवाजी तरुण मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, अध्यक्ष अंकुश माळी, सरपंच संजयकुमार माळी, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच धीरज वाघ,माजी सरपंच सिद्धेश्वर मुंबरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख, माजी उपसरपंच संतोष निंबाळकर, सावता परिषदेचे बार्शी तालुका युवक अध्यक्ष अशोक माळी, ग्रा.प.सदस्य समाधान पाडुळे मंडळाचे गिरीश माळी, यशवंत गाडे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.