कुतूहल न्यूज नेटवर्क
शिक्रापूरचे ‘वादग्रस्त’ पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांची नियंत्रण कक्षात बदली
पुणे प्रतिनिधी: पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या कडून माजी सरपंचासह सह पोलिस कर्मचाऱ्यांना हजेरी दरम्यान शिवीगाळ प्रकरणी वरिष्ठांना तक्रारी अर्ज करण्यात आला होता. याबाबत माजी सरपंच रामभाऊ सासवडे तसेच पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत खुनाची धमकी दिल्याचा प्रकारामुळे पोलिस निरीक्षक उमेश तावस्कर यांची बदली करण्यात आली.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर शिक्रापूर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी पोलीस अधीक्षक व पोलीस कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडे गेल्या होता. तावसकर हे मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप करत असल्याचे कारण देत ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात देखील तावसकर यांना आठ दिवसांसाठी बाहेर ठेवण्यात आले होते. तर एक महिन्यापूर्वी कोरोना झाल्याने तावसकर यांना एक महिना पोलिस स्टेशन पासून दूर ठेवण्यात आले होते. माञ, तावसकर हे शिक्रापूर पोलीस स्टेशनला दाखल होताच त्यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची हजेरी घेत असताना शिक्रापूर येथील एका माजी सरपंचाच्या कुटुंबाबाबत अपशब्द वापरले होते तर एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील अपशब्द वापरले होते. याबाबत सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती तर संबंधित माजी सरपंचाने मुख्यमंत्री, गृहमंत्री, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन व तक्रार केली होती. त्यामुळे उमेश तावसकर यांच्या विरोधात प्रशासनात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली होती अखेर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी उमेश तावसकर यांची नियंत्रण कक्ष येथे बदली केली आहे.