पांगरी ( ता बार्शी ) : कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीमध्ये शिवभोजन थाळी केंद्र सुरू
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे सर्व हॉटेल बंद आहेत.त्यामुळे हॉस्पिटल ,मोलमजुरी करणारे नागरिकांना एकवेळचे अन्न मिळणेही कठीण जात आहे.या पार्श्वभूमीवर पांगरी शहरात बार्शी लातूर रोड, जय भवानी हॉटेल येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्राचा प्रारंभ गुरुवार (दि.2) निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे,मंडळ अधिकारी विशाल नलावडे,अव्वल कारकून ऋषिकेश धनवडे,पुरवठा निरीक्षक अभय साबळे,सुहास देशमुख,विष्णू पवार,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट,जयंत पाटील,गणेश गोडसे,बाबासाहेब शिंदे,सचिन ठोंबरे आकाश गुळवे आदींच्या उपस्थित करण्यात आला. गरजू नागरिकांना अवघ्या पाच रुपयांत शिवभोजन थाळी मिळणार आहे.ही थाळी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.