fbpx

महामानव संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच निरंजन चिकणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चिकणे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार उपसरपंच निरंजन चिकणे, कृष्णा चिकणे, धनाजी चिकणे, अमोल चिकणे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, मान्यवरांचे सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी युवा उद्योजक धनाजी चिकणे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे, अमोल नरखडे, संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, गणेश लंगोटे, गुलाब शेख, सुमित माळी, अमित काळे, नागनाथ फोके, शिवाजी चिकणे, अमोल नरखडे, बाळकृष्ण पिसे, राहुल मचाले, विश्वनाथ बारवकर, किशोर बारवकर, राजेंद्र गोरे, संजय बनसोडे आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर प्रस्तावना भैरवनाथ चौधरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *