कुतूहल न्यूज नेटवर्क -विजयकुमार मोटे
भाळवणीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याना शिवसेनेच्यावतीने जोडोमारो आंदोलन
पंढरपूर : कर्नाटक येथील बेळगाव जवळील मानगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाळवणी (ता. पंढरपूर) येथे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून जोडोमारो आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याला येथील शिवकालीन वेशिजवळ वाहनाचा (चप्पल) प्रसाद देऊन जोडोमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी- जय शिवाजी, अरे आवाज कोणाचा..शिवसेनेचा असा नारा देत कर्नाटक भाजपा सरकार मुर्दाबादाच्या घोषणेने सारा परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, दिलीप भानवसे, प्रवीण शिंदे, शकील काझी, महेश इंगोले, पोपट इंगोले, जयसिंग पवार, भैय्या पटेल, श्रीराम माने, पिंटू हिंगमीरे, युवराज पाटील, महादेव पवार, अजित राऊत, रमेश निराळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.