fbpx

Ramdas Kadam: शिवसेना नेते रामदास कदम यांना करोनाची लागण; रुग्णालयात दाखल

कुतूहल न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात सर्व सामान्य नागरिकांबरोबर राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

त्यात आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रामदास कदम यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कदम यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली होती. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणताही संशय मनात न ठेवता सर्वांनी लस घ्यावी असे आवाहनही कदम यांनी केले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *