कुतूहल न्यूज नेटवर्क
ईडीच्या चौकशीला घाबरून राणेंनी भाजपमध्ये पळ काढला, आमदार वैभव नाईक यांचा हल्लाबोल
सिंधुदुर्गः आपली ईडी चौकशी होणार या भीतीनेच नारायण राणे यांनी सरळ भाजपमध्ये पळ काढला असा हल्लाबोल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला. नारायण राणे यांना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा काडीचाही अधिकार नसल्याची टीकाही नाईक यांनी यावेळी केली.
एका भरगच्च पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. नारायण राणेंनी गेली दहा वर्षे अनेक आव्हाने आणि भविष्यवाणी केल्यात, काँग्रेसमध्ये असताना मी मुख्यमंत्री होणार त्यानंतर शिवसेना विसर्जित करणार, अशा वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. या त्यांच्या घोषणांचं पुढे काय झालं हे लोकांना माहीत आहे, असं टीकास्त्रही वैभव नाईकांनी सोडलं. त्यामुळे राणेंच्या भविष्यवाणीला आता लोक काडीची किंमत देत नाहीत, अशा शब्दांत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंचा समाचार घेतलाय.
एका भरगच्च पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल अशी पुन्हा एकदा भविष्यवाणी करणाऱया राणे यांना नाईक यांनी चांगलेच सुनावले. ते म्हणाले, राणे यांनी गेली 10 वर्षे अनेक आव्हाने दिली आणि भविष्यही वर्तवले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील अनेक कार्यकर्ते राणेंना सोडून पुन्हा शिवसेनेत येत आहेत. ते आपल्यासोबत थांबले पाहिजेत म्हणून राणेंची भविष्यवाणी सुरू आहे. स्वतःचे राजकीय भवितव्य टिकविण्यासाठीच त्यांची धडपड सुरू असल्याचे वैभव नाईक म्हणाले.
