fbpx

पेट्रोल-डिझेल दरवाढी निषेधार्थ आकुर्डीत शिवसेनेची निदर्शने

दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क

निगडी : दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे.गेल्या ६ वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळात पेट्रोलचे ९१ तर डिझेलचे दर ७९ रूपयांवर पोहचले आहेत. त्याचा निषेध पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. “मोदी सरकारचा धिक्कार असो”.. अशा घोषणा देत आकुर्डी येथील खंडोबा मंदीर चौकात जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर यांच्या नेतृत्वात मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले, कच्च्या तेलाची किंमत १४० डॉलर प्रति बॅरेल असताना युपीए सरकारच्या वेळी पेट्रोल ७२ रुपये झाले म्हणून २०१४ साली ओरडणारे मोदी आणि भाजपचे प्रवक्ते आज ५० डॉलर प्रति बॅरेल तेलाची किंमत असताना पेट्रोल ९१ रुपये प्रति लिटर झाले तरी गप्प का? हेच का ते अच्छे दिन असे जनसामान्य विचारत आहेत ? पेट्रोल व डिझेल दरवाढ करून सामान्यांचे खिसे कापण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात पेट्रोल व डिझेल देण्याऐवजी दरवाढ केल्याने महागाईत देखील वाढ झाली आहे. अशा प्रकारे सामान्य जनतेच्या महिन्याचे अंदाकापत्रक बिघडवणाऱ्या मोदी सरकारचा तीव्र निषेध.

यावेळी शहरसंघटिका ऍड.उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, विधानसभा संघटक विजय गुप्ता, पिंपरी विधानसभा संघटक रोमी संधू, पिंपरी विधानसभा संघटक दीपक ढोरे, नगरसेविका रेखा दर्शिले, पिंपरी विधानसभा उपशहरप्रमुख अमोल निकम तुपार नवले, उपशहप्रमुख युवराज कोकाटे, पिंपरी चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख सोमनाथ गुजर, विजय साने, हरीश नखाते, युवासेना अधिकारी शर्वरी जळमकर, कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, विभागप्रमुख सव्यद पटेल, राजू सोलापुरे, चेतन शिंदे, नाना काळभोर, गोरख पाटील, सोनू संधू, प्रदीप दळवी, अनिल पारचा, मच्छिंद्र देशमुख ,रामचंद्र जमखंडी, आधिकराव भोसले, सागर शिंद, प्रवीण शिंदे, लालचंद्र शर्मा, गणेश आहेर, सुनिल ओव्हाळ, रविकिरण घटकर, विभाग संघटिका शिल्पा अनपन, मीना डेरे, पुष्पा तारू, भाग्यश्री म्हस्के, कांती शिंदे, माऊली जगताप, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *