कुतूहल न्यूज नेटवर्क
अक्कलकोट : दयानंद गौडगांव
तालुक्यातील बहुतेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात खत खरेदी करत आहेत. याचा फायदा खत विक्री करणाऱ्या दुकानदार चढ्या दराने विक्री करणे व खताचा गोणी शिल्लक असताना शेतकऱ्यांशी खोटे बोलणे, बोगस बियाणे विकणे व बियाणे चढे दराने विक्री करणे या सारख्ये कृत्य अक्कलकोट तालुक्यातील खत विक्री दुकानदार करत असल्याचे तक्रार अक्कलकोट शिवसेनेकडे आली आहे. याची गंभीर दखल अक्कलकोट शिवसेनेने घेतली असुन संबंधिताची खाञी करून शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे उपजिल्हा प्रमुख संतोष अण्णा पाटील तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट शिवसेनेकडून योग्य कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याचे शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.
चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदारावर शिवसेना गुन्हा दाखल करणार; आनंद बुक्कानुरे
तालुक्यातील आणखीन कोणत्याही शेतकऱ्याचा अशा प्रकारची पिळवणूक झाले असेल तर माझ्याशी संपर्क करा. तुमचा कडुन घेतलेल्या चढ्या दाराची रक्कम परत मिळवून देऊ असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख, उपप्रमुख सुर्यकांत कडबगावकर, योगेश पवार, सैपन पटेल, प्रविण गाडगे, पंडित मोरे, चैडपा गुजा, खंडु कलाल, बसवराज बिराजदार, संतोष रत्नाकर, राजु गोणापुरे, रजपुत, यल्लपा मोरे, तालुका महिला संघटक वर्षा चव्हाण, शहर संघटक वैशाली हावनुर, ताराबाई कुंभार, सह आदी उपस्थित होते.