कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ तुळजापूर तालुक्यातून करण्यात आला. या अभियानाची सुरुवात तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, सलगरा, होर्टी, जळकोट, नांदगाव, खुदावाडी या पंचायत समिती गणातून केली.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात; तुळजापूर तालुक्यातून शुभारंभ
शिवसंपर्क अभियान हे शिवसेना प्रत्येक घराघरांत व मनामनात रुजविण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी असून शिवसैनिकांनी संकटाच्या काळात प्रत्येक घराघरात जाऊन जनतेच्या अडचणी सोडवत पक्षासाठी काम करण्याचे आवाहन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाप्रमुख अमीर शेख, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, उपतालुका प्रमुख रोहित चव्हाण, शहरप्रमुख सुधिर कदम, सोशल मिडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, भीमा अण्णा जाधव, शाम माळी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, गावकरी उपस्थित होते.