कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: स्व.शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती ही बाल शिव उत्सव म्हणून साजरी करण्यात आली. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अतिष गायकवाड, शंकर गायकवाड, बाबा शिंदे, बिभीषण गरड, विनायक गरड यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले आहे. यावेळी शाळेतील कर्मचारी, बाल शिव विद्यार्थी, जिजाऊ विद्यार्थी व मावळे उपस्थित होते.