fbpx

शोभाताई सोपल स्कॉलरशिप वितरण सोहळा संपन्न

Shobhatai Sopal Scholarship Distribution Ceremony

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी:  ३/४/२०२५  रोजी स्व शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल ,पांगरी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शोभाताई सोपल स्कॉलरशिप वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या द्वारकाबाई गरड ,सुनिता मुंडे, सोनाली मुळे व विनायक गरड सर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचा आरंभ मान्यवरांच्या हस्ते तसेच कार्यक्रमास आलेल्या श्रोत्यांच्या व प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफ समवेत प्रतिमा पूजनाने करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे प्रशालेचे संस्थापक  विनायक गरड सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सर्वप्रथम वर्षभरातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले .सर्वप्रथम Best student in the class या अवॉर्ड चे वितरण करण्यात आले या अवॉर्डसाठी पात्र असणारे विद्यार्थी खालील प्रमाणे
१) स्वरा प्रदीप पाटील नर्सरी
२)अक्षरा विलास पवार ज्युनिअर केजी
३)हिमांशू कुशल भोसले सिनियर केजी
४)भक्ति दिलीप पाटील सिनियर केजी
५)स्वराली संदीप देशमुख १ली
६) प्रीतम प्रवीण पाटील १ली
७)प्रज्वल मनोज जगदाळे २री
८)शौर्य योगेश बसाटे २री
९)सोहम अंकुश वाघे ३री
१०)स्वराज नितीन वाघमारे ३री
११)विवेक जयसिंग मोरे ४थी
१२) स्वराज बाळासाहेब सातनाक ५वी

उत्कृष्ट हस्ताक्षर विद्यार्थी ( Best Handwriting)
१) श्रीधन निलेश पाटील ४थी
२) ईश्वरी अभिजीत जगदाळे १ली
३) रुद्र सुहास मुळे सिनियर केजी

उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थी
१) तनवीर वसीम शेख नर्सरी
२) शुभांगी वैभव कदम २री

*उत्कृष्ट विद्यार्थी (Best student in the school)
१) शिवरानी सुकुमार करळे ज्युनिअर केजी
२) पियुष सुधाकर शिंदे सिनियर केजी
३) तेजस राहुल धावणे ३री
४) स्वराली राजेंद्र चौधरी ५वी

कराटे उत्कृष्ट विद्यार्थी
१) सार्थक विभीषण सांगळे इ.४थी

स्केटिंग उत्कृष्ट विद्यार्थी
१) रियांश नितीन घाडगे Jr kg

कार्यक्रमात पुढे शालेय विज्ञान प्रदर्शनात ज्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण आपल्या कला- कौशल्यांना तसेच विज्ञानाला भर देऊन तयार केलेल्या आपापल्या प्रोजेक्टसाठी जे विजेते ठरले अशा विद्यार्थ्यांनाही ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
पूर्व प्राथमिक मधून (pre- primary section)
1)स्पंदन शिंदे (human lungs) सिनियर केजी
2)निशांत शिंदे(solar system) सिनियर केजी
3)किरण शेळके (wind meal) सिनियर केजी

प्राथमिक मधून (primary section)
१) विराज नितीन चौधरी अँड ग्रुप (electrical cutter)
२)शौर्यसंग्राम गायकवाड (synthetic farming) ३)तेजस्विनी मुंडे अँड ग्रुप (digestive system)

पुढे कार्यक्रमांमध्ये प्रशालेतर्फे महिला पालकांचे घेण्यात आलेली funny balloon competition या स्पर्धेमधून महिला बालकांना स्वतःसाठी एक विरंगुळा म्हणून एक आनंदी क्षण मिळावा यासाठीच प्रशालेतर्फे राबविण्यात आलेला होता. या स्पर्धेतील विजेत्या पालक महिलांना देखील प्रशाले तर्फे बक्षीस वाटप करण्यात आले.
१) सुनिता नागनाथ मुंडे प्रथम क्रमांक
२)प्रमिला प्रमोद नागटिळक द्वितीय क्रमांक
३) ज्योती राजेंद्र काकडे तृतीय क्रमांक

कार्यक्रमात सर्वात मोठा उद्देश म्हणजे प्रशालेतर्फे  विनायक गरड सर यांच्या हस्ते देण्यात येणारी शोभाताई सोपल शिष्यवृत्ती होय. या शिष्यवृत्ती मधून ज्या विद्यार्थिनी अतिशय दुर्बल परिस्थितीतून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात अशा पाच विद्यार्थिनींना प्रशालेतर्फे दरवर्षी शोभाताई सोपल शिष्यवृत्ती देण्यात येते.
१) ईश्वरी निलेश भालेराव
२) पायल नंदू निमगिर
३) संस्कृती तानाजी मुळे
४) फलक राजेंद्र वाघे
५) गौरी गजेंद्र चौधरी

पुढे कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध किंवा भविष्याबद्दलचा आढावा घेऊन प्रशालेने नव्याने घेतलेला निर्णय तो म्हणजे यावर्षीपासून CBSE pattern व State board pattern या अभ्यासक्रमाविषयी प्रशालेतील विषय शिक्षकांचे मार्गदर्शन झाले. प्रशालेचे संस्थापक श्री विनायक गरड सर यांनीही याविषयी पुढील शैक्षणिक वर्ष २०२५ /२६  चे महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेतील सौ. प्रतिभा पालखे यांनी केले, तर सर्व कार्यक्रम अतिशय शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांनीही आपले योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *