fbpx

श्री.गणेश वस्त्र दालनाच्या चारचाकी गाडीचा विजेता ठरला सचिन लंकेश्वर, होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रियंका मराठे, शुभदा देवकते विजेत्या

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी: बार्शी शहर व परिसरात अल्पावधित प्रसिद्ध झालेल्या श्री. गणेश या भव्य कौटुंबिक वस्त्र दालनात फॅमिलीसाठी गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या योजनेचा भव्य लकी ड्रॉ आगळगाव रोड वरील राज मंगल कार्यालय येथे सोमवारी संपन्न झाला.

या लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांकाच्या चारचाकी गाडीचा विजेता बार्शी येथील सचिन लंकेश्वर हा ठरला असून त्याने आपल्या लग्नासाठीची खरेदी श्री. गणेश येथून केली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांचा विवाह झाला त्यांनी आपल्या नववधू सह येऊन चारचाकी गाडी स्विकारली, द्वितीय क्रमांकाचे बक्षिस हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल आंबी ता. भुम जि. उस्मानाबाद येथील शिवराज गटकळ यांना मिळाली तर तृतीय क्रमाकांचे बक्षिस लेडिज स्कुटर पाथरी ता. बार्शी येथील बालाजी पाटील यांना मिळाली. यासोबतच जेन्ट्स सायकल, लेडिज सायकल, एलईडी टी.व्ही, होम थियटर, फॅन, इस्त्री, कुकर,मिक्सर, मोबाईल, घडयाळ, वॉटर प्युरिफायर, पर्स, लंच बॉक्स, कुलर, फ्रिज, मनगटी घडयाळ आदी एकशे एक बक्षिसे ग्राहकांना लक्की ड्रॉ द्वारे देण्यात आली.

या कार्यक्रमात खास महिला ग्राहकांसाठी खेळ रंगला पैठणीचा ( होम मिनिस्टर ) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फुर्त पणे सहभाग नोंदविला. या स्पर्धात प्रियंका मराठे, शुभदा देवकते या पैठणी साडीच्या विजेत्या ठरल्या.

कार्यक्रमासाठी माजी आमदार दिलीप सोपल,हभप ॲड.जयवंत महाराज बोधले, अरुणभाऊ कापसे, वाशीचे नगराध्यक्ष निश्चित तात्या चेडे, उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापती संजय लोखंडे, नगरसेवक विलास रेणके, नाना वाणी, जयंत राजे भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमात खास महिलांसाठी होम मिनिस्टर फेम क्रांती ( नाना ) मळेगांवकर व बालगायिका सह्याद्री मळेगांवकर यांनी खेळ रंगला पैठणीचा ( होम मिनिस्टर ) हा कार्यक्रम बारदस्तपणे सादर केला त्यास उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमास बार्शी शहर व तालुक्यातील व शेजारील तालुक्यातील ग्राहकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती. तसेच या योजनेचे पुढील वर्षासाठीच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून वरील बक्षिसे ग्राहकांना लकी ड्रॉ द्वारे मिळणार आहेत तसेच बक्षिसांची संख्या एकशे एक वरून तीनशे एक अशी केल्याची घोषणा उद्योजक महेश यादव, गणेश नान्नजकर, संतोष जाधवर,बाळासाहेब कामटे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *