आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात संविधान दिन साजरा
बार्शी प्रतिनिधी : बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात सोशल डिस्टन चे पालन करत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. पाटील तर प्रमुख पाहुणे प्रा.व्ही . ए. पाटील होते.यावेळी डॉ. व्ही.पी .लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख व्ही .ए. पाटील यांनी संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पी. एस. गांधी यांनी केले होते.यावेळी पर्यवेक्षक एस. आर .खराडे, एनसीसी विभाग प्रमुख एस. एस. शेख, के.टी व्हनहूवे, डॉ.जे. के. काशीद प्रा. वाघमारे, काझी आदी उपस्थित होते.